अवैध गौण खनिज वाहतूक सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:41 PM2019-11-16T22:41:31+5:302019-11-16T22:42:03+5:30

विश्लेषण

Invalid secondary mineral transport | अवैध गौण खनिज वाहतूक सुसाट

अवैध गौण खनिज वाहतूक सुसाट

Next

जळगाव : शहर व परिसरात गौण खणिजाची वाहतूक सुरूच असून तीन दिवसात तीन कारवाया होऊनही त्यास चाप बसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागाला हे वाहतूक जुमानत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुरूमचा अवैधरीत्या उपसा करून त्याची वाहतूक करीत असलेले दोन डंपर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनाच आढळून आले. त्यानंतर त्यांनी तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार क्षमतेपेक्षा अधिक मुरूमचा उपसा केल्याने संबंधित डंपर मालकांला एक कोटी तीन लाख चार हजारांचा दंड करण्यात आला. हा प्रकार होत नाही तोच दुसऱ्या दिवशी निमखेडी येथे अवैध वाळू आढळून आली व तिसºया दिवशी डबरची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
मेहरूण परिसरात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांना दोन डंपर मुरूमची वाहतूक करताना आढळून आले होते. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या डंपरला थांबवून चौकशी केली असता डंपर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार ांना डंपरची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदारांनी पंचनामा केला. अवैधरीत्या मुरूम वाहतूक करताना व एक पोकलँड अवैधरीत्या उत्खनन करताना उघड झाले. दोन्ही डंपर जप्त करून ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आले आहेत. या प्रकरणात डंपर मधील मुरुम व उत्खनन केलेल्या जागेची चौकशी केली असता त्यात ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक मुरूम काढल्याचे आढळून आले.
अवैधरीत्या वाहतूक करणारी वाहनांनी शिरसोली येथील तलावातून महामार्ग क्रमाक ५३ (जुना महामार्ग) च्या चौपदरीकरणासाठी मुरूम उत्खनन केले होते. उमाळा गट क्रमांक २०४ मध्ये १५०० ते १६०० ब्रास नवीन खोदकाम आढळून आले. उत्खननास परवानगी होती. मात्र उत्खनन सरकारी गट क्रमांक २०४मध्ये झालेले आढळून आले. अंदाजे ६०० ब्रास अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन झालेले पथकास आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारे अवैध उपसा होत असेल तरी ग्रामीण भागात काय स्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Invalid secondary mineral transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव