Interrupted government work | शासकीय कामात अडथळा आणला

शासकीय कामात अडथळा आणला

ठळक मुद्देबिलाखेड येथील घटनातिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव, जि.जळगाव : दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी भूषण पाटील यांच्या शर्टची कॉलर ओढून बटन तोडले व शासकीय कामात अडथळा आणला तसेच महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड यांनाही शिवीगाळ केली म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बिलाखेड येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, पोलीस कर्मचारी धाड टाकण्यासाठी गेले असता पंडित सोनवणे याने पोलिसांना सांगितले की, आमच्यावर अनेक केसेस आहेत. त्यातून काय झाले, असे सांगून त्याने व त्याच्या मुलांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पंडित पुंजू सोनवणे, प्रकाश उर्फ भुऱ्या पंडित सोनवणे व प्रदीप पंडित सोनवणे या तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहे.

Web Title:  Interrupted government work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.