शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

प्लॅस्टिक विरोधात हेतुपुरस्सर षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:31 PM

जळगाव : गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. ...

जळगाव : गेल्या वीस वर्षात प्लॅस्टिकच्या वापरात अत्यंत वेगाने वाढ झाल्याने प्लॅस्टिक विरोधात अचानक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. मात्र धातू व इतर घटकांपासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या क्षेत्रातील उद्योगांनी तयार केलेले हे षडयंत्र आहे असा आरोप ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका यांनी केला. मंदिची कोणीच चिंता करू नये, मंदित जो जिंकतो तो सिकंदर असतो, असेही त्यांनी नमूद केले.मुंबई येथे होणाºया ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनामागील हेतू व आयोजनासंदर्भातील भूमिका मांडण्यासाठी आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे जळगावातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ त्या वेळी मुरारका बोलत होते.यावेळी खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी डॉ़ अविनाश ढाकणे, ‘जिंदा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी, ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे उपाध्यक्ष किशोर संपत आदी उपस्थित होते. संपत व मुरारका यांनी चित्रफितीच्या माध्यमातून प्रदर्शनाची भूमिका व आयोजनाची माहिती दिली़ जळगावात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक उद्योग असल्याने प्लॅस्टिक उद्योगात जळगावचा मोलाचा वाटा असून येथील उद्योजक व्यापाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही दोघांनी केले़ या वेळी सचिन लढ्ढा, प्रशांत पाटील, श्रीकांत चौधरी, संतोष पाटील, हरिष यादव, तुषार पटेल, सागर मनधान, रामदास कोळी, संदीप लाड, ओमप्रकाश सिंग, भुवनेश्वर सिंग, रवी फालक यांचा सत्कार करण्यात आला़मुंबई येथे १६ ते २० जानेवारीदरम्यान ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०’ प्रदर्शनप्लॅस्टिक उद्योगातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेची स्थिती या विषयी एकाच ठिकाणी माहिती होण्यासाठी आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनाचे १६ ते २० जानेवारीदरम्यान मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रातील अडीअडचणींविषयी तज्ज्ञ उद्योजक मार्गदर्शनही करणार आहेत. या संदर्भात रविवारी जळगावात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका, उपाध्यक्ष किशोर संपत, जळगावचे प्रकल्प प्रमुख रवींद्र लढ्ढा, जळगाव प्लॅस्टिक रि-प्रोसेसिंग इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रदर्शन समितीचे समन्वयक विनोद बियाणी, लघु उद्योग भारतीचे उपाध्यक्ष रवी फालक, सचिव समीर साने, समन्वयक संतोष इंगळे उपस्थित होते. मुरारका यांनी सांगितले की, अशा प्रकारचे हे अकरावे प्रदर्शन असून ते मुंबई येथे बॉम्बे एक्सिबिशन सेंटर येथे होणार आहे.यात २५ देशातील दीड हजार उद्योजक सहभागी होणार आहे. या प्रदर्शनास युएफआय या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सर्वोच्च समितीसह भारत सरकारने मान्यता दिली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या प्रदर्शनासाठी देशभर ५०हून अधिक रोड आयोजित केले असून त्याद्वारे अडीच लाखाहून अधिक व्यावसायिक, पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव