उद्योग सहसंचालकांनी दिल्या कृत्रिम ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST2021-08-20T04:22:23+5:302021-08-20T04:22:23+5:30

जळगाव : नाशिक विभागीय उद्योग सहसंचालक शैलेंद्र सिंग राजपूत यांनी बुधवारी जिल्हा उद्योग केंद्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांबाबत बैठक घेतली ...

Instructions for the production of artificial oxygen issued by the Joint Director of Industry | उद्योग सहसंचालकांनी दिल्या कृत्रिम ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या सूचना

उद्योग सहसंचालकांनी दिल्या कृत्रिम ऑक्सिजन निर्मिती करण्याच्या सूचना

जळगाव : नाशिक विभागीय उद्योग सहसंचालक शैलेंद्र सिंग राजपूत यांनी बुधवारी जिल्हा उद्योग केंद्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांबाबत बैठक घेतली आहे. त्यात नऊ युनिटला ऑक्सिजन निर्मितीसाठी भूखंड देण्यात आले आहे. मात्र त्यांनी प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात केली नाही. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उत्पादन सुरू करण्याच्या सूचना राजपूत यांनी या बैठकीत दिल्या.

उद्योग सहसंचालक शैलेंद्रसिंग राजपूत यांनी बुधवारी जिल्हा उद्योग केंद्रात

ऑक्सिजन निर्मिती युनिट,बँकर्स व जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांची

बैठक घेतली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ,

एमआयडीसी अधिकारी व बँकांचे जिल्हा समन्वयक, औद्योगिक समूहांचे प्रतिनिधी

उपस्थित होते. ऑक्सिजन निर्मितीसाठी जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये नऊ युनिटला ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी

भूखंड देण्यात आलेले आहेत. काहींनी भूखंडावर बांधकाम पूर्ण केले. काहींनी ऑक्सिजन

निर्मितीसाठी ऑर्डर दिलेली आहे. तिसऱ्या लाटेत जिल्हा ऑक्सिजनच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीला सुरुवात

करण्याबाबत राजपूत यांनी सूचना दिल्या.

बँकांच्या समन्वयकांचीही घेतली बैठक

सहसचंलाक राजपूत यांनी यानंतर बँकांच्या जिल्हा समन्वयकांचीही बैठक घेतली. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांचे

उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची अभ्यासगतांना माहिती होण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटनही त्यांच्या

हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातून क्लस्टरसाठी चार प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. या क्लस्टर्सना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Instructions for the production of artificial oxygen issued by the Joint Director of Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.