चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाची गुरुवारी नॅक समितीने पाहणी केली.
या समितीत डॉ. मनिअन सेलामुथू(कुलगुरू, अन्नामलाई विद्यापीठ) डॉ. एम. के. सिंग (विनोबा भावे विद्यापीठ, झारखंड), डॉ. बाबू थरीत (प्राचार्य, ख्रिस्त अकॅडमी, बंगलोर, कर्नाटक) यांचा समावेश होता.
संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील व संचालक माजी प्र. प्राचार्य प्रा. डी. बी. देशमुख यांनी स्वागत केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. समितीने ग्रंथालय, जिमखाना व क्रीडांगण, वसतिगृह, विविध अभ्यासकेंद्र, एन.सी.सी. व एन.एस.एस. विभाग जलपुनर्भरण व्यवस्था, गांडूळ प्रकल्प, सौरऊर्जा संच, तसेच महाविद्यालयातील तिघे विद्याशाखांचे विषयनिहाय सर्व विभागांना प्रत्यक्ष भेट दिली.
यावेळी उपाध्यक्ष आशा विजय पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, प्र. प्राचार्य डॉ. ए. एल. चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एन. एस. कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे, प्र. रजिस्टार डी. एम. पाटील, प्रा. दीनानाथ पाटील, आदी उपस्थित होते.