कॉन्सन्ट्रेटर खरेदी प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:08+5:302021-09-08T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेल्या १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेरची चौकशी गेल्या पंधरा दिवसापासून थंडबस्त्यात अडकली आहे. ...

कॉन्सन्ट्रेटर खरेदी प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाने खरेदी केलेल्या १२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेरची चौकशी गेल्या पंधरा दिवसापासून थंडबस्त्यात अडकली आहे. दोन दिवसात समितीला अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, समितीप्रमुख डॉ. यु. बी. तासखेडकर यांचीच बदली झाल्याने या चौकशीत नेमके चालेलय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे स्मरणपत्र तक्रारदार दिनेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.
प्रभंजन ऑटोमोबाईलकडून हे १२० व्हेंटिलेटर विविध ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आले आहेत. यात एका कॉन्सन्ट्रेटरची किंमतही सव्वा लाख लावण्यात आली आहे. बाजारात हेच व्हेंटिलेटर २० ते २५ हजारात उपलब्ध असून यात मोठा गैरव्यवहार झाल्याबाबत दिनेश भोळे यांनी तक्रार दिली आहे. यानुसार स्पेसिफिकेशन प्रशासकीय अधिकारी डॉ.उल्हास तासखेडकर व डॉ.वृषाली सरोदे यांचा समावेश आहे. समितीच्या सदस्यांना चौकशीबाबत २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पत्र प्राप्त झाले होते. तपासणीत खरेदी केलेले कॉन्सन्ट्रेटर व प्राप्त कॉन्सन्ट्रेटरच्या स्पेसिफिकेशनची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, पंधरा ते सोळा दिवस उलटूनही यात अद्याप कसलीच हालचाल नसल्याने भोळे यांनी स्मरणपत्र दिले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, पुरवठादार प्रभंजन ऑटोमोबाईलचे आदित्य जाखेटे यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदार दिनेश भोळे यांनी स्मरणपत्रात केली आहे.
एका दिवसात कार्यमुक्त
भांडारपाल मिलिंद काळे यांची बदली होऊनही त्यांना अडीच वर्ष कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले. दुसरीकडे कॉन्सन्ट्रेटरची चौकशी असलेल्या डॉ. तासखेडकर यांची बदली झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्स डॉ. चव्हाण यांनी त्यांना एकाच दिवसात कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.