अपघातातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:03 IST2019-10-11T22:03:06+5:302019-10-11T22:03:42+5:30
जळगाव : सहा दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या गोविंदराव मंगलसिंग परमार (५२ रा.तालखेड ता.मलकापुर) या शेतकºयाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेत ...

अपघातातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू
जळगाव : सहा दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या गोविंदराव मंगलसिंग परमार (५२ रा.तालखेड ता.मलकापुर) या शेतकºयाचा खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना शुक्रवारी दुपारी १२ वाजता मृत्यू झाला आहे. गोविंदराव हे सहा दिवसांपूर्वी दुचाकीवरुन जात असतांना दाताळा या गावाजवळ दुचाकीला मागून धडक दिल्याने अपघातात जखमी झाले होते. यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार घेत असतांना सहा दिवसानंतर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात वडील मंगलसिंग जवानसिंग परमार, पत्नी सुनीता, मुलगा विश्वजीत, मुलगी ऐश्वर्या असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.