माहिती लपविली; दोघांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 13:43 IST2020-05-14T13:43:04+5:302020-05-14T13:43:32+5:30

जळगाव : नाशिक जिल्ह्यातून शिवाजी नगरात आल्यानंतर त्याची माहिती लपवून ठेवली व आरोग्य तपासणीही केली नाही म्हणून शेख अनीस ...

Information hidden; Crime against both | माहिती लपविली; दोघांविरुध्द गुन्हा

माहिती लपविली; दोघांविरुध्द गुन्हा

जळगाव : नाशिक जिल्ह्यातून शिवाजी नगरात आल्यानंतर त्याची माहिती लपवून ठेवली व आरोग्य तपासणीही केली नाही म्हणून शेख अनीस शेख चांद (रा.शिवाजी नगर) व शेख अलतिया आसीफ पटेल (रा.इस्लामपूर, विचंूर, ता.निफाड, जि.नाशिक) या दोघांविरुध्द बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजीनगरात मनपाच्या दवाखान्याजवळ नाशिक जिल्ह्यातून काही व्यक्ती वास्तव्यास आले आहेत, आणि त्यांनी कोणतीही आरोग्य तपासणी केलेली नाही, अशी माहिती मनपाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी आरोग्य अधिकारी विकास पाटील यांना खात्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या घरी पाठविले असता तेथे शेख अलतिया आसीफ पटेल (इस्लामपूर, विचंूर, ता.निफाड, जि.नाशिक) हे आलेले होते. त्यांनी ही माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे या दोघांविरुध्द बुधवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मास्क न घालता फिरणाऱ्या तीनजणांना ५०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

Web Title: Information hidden; Crime against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव