महाविरनगरात संसर्ग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:16+5:302020-12-04T04:44:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील काही भागांमध्ये कोरोना डोकेवर काढत असल्याचे चित्र आहे. महाविर नगरात आरटीपीसीआर चाचणीतून एक ...

महाविरनगरात संसर्ग वाढला
लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील काही भागांमध्ये कोरोना डोकेवर काढत असल्याचे चित्र आहे. महाविर नगरात आरटीपीसीआर चाचणीतून एक तर ॲन्टीजन चाचणीतून तीन जण बाधित आढळून आले आहेत. शहरातल १४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यात ५४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारीही १ हजारापेक्षा कमी चाचण्या झाल्या. यात ॲन्टीजन ७३१ तर आरटीपीसीआरसाठी २५८ स्वॅब घेण्यात आले. यात ५४ बाधित आढळून आले आहेत. ४४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव शहरातील ५० वर्षीय महिला व भुसावळ तालुक्यातील ६८ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ५११ वर पाेहोचली आहे. एकूण रुग्णांची संख्या ५४६४३ झाली असून यापैकी ५२८३० रुग्ण बरे झालेले आहेत, तर १३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या भागात आढळले रुग्ण
महाविर नगर ४, श्रद्धा कॉलनी, सुंदर मोती नगर १, प्रज्ञा कॉलनी १, कोल्हे नगर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत.