शिरसोली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:24 IST2021-08-17T04:24:04+5:302021-08-17T04:24:04+5:30
बारी समाज विद्यालय बारी समाज विद्यालयात अध्यक्ष रामकृष्ण धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे, सचिव ...

शिरसोली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात
बारी समाज विद्यालय
बारी समाज विद्यालयात अध्यक्ष रामकृष्ण धनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे, सचिव सुरेश अस्वार, संचालक, शिक्षक सुरेश बारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ हजर होते.
पद्मालया इंग्लिश मीडियम स्कूल
पद्मालया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इंदुबाई पंढरीनाथ बारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा भारती बारी, सचिव भगवान बारी, मुख्याध्यापक स्वाती चौधरी, सागर बारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
शिरसोली प्र. न. ग्रामपंचायत
शिरसोली प्र. न. ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच हिलाल भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्रावण ताडे, रामकृष्ण काटोले, भगवान बोबडे, श्याम बारी, विनोद अस्वार, मुदस्सर पिंजारी, ग्रामविस्तार अधिकारी सुनील दांडगे, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत
शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत येथे मुरलीधर ढेंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विनोद भिल्ल, ग्रामपंचायत सदस्या सीमा पाटील, श्रद्धा बारी, उषा पवार, डिगंबर बारी, नितीन बुंधे, ग्रामविस्तार अधिकारी दिलीप शिरतुरे, तुषार अस्वार, चिंधू बारी, मुख्याध्यापक श्रीधर वांद्रे यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
जिजामाता विद्यालय
जिजामाता शिक्षण प्रसारक हि. ज. पाटील, जे. बी. पाटील उच्च माध्यमिक शाळेत पीक संरक्षण सोसायटीचे सचिव पूनमचंद माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जगतराव पाटील, प्रमोद पाटील, सदस्य माधवराव पानगळे, संभाजी पाटील, प्राचार्या कल्पना पाटील, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी हजर होते.
अध्यापक विद्यालय व आयटीआय
जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ संचलित अध्यापक विद्यालय व आयटीआयचे प्राचार्य जगदीश निमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका अर्चना भोसले, हेमंत पाटील, लिपिक हेमराज पाटील हजर होते.