Independence Day : जळगावात देशभक्तीपर गीत, नृत्यातून रंगला ‘बलसागर भारत होवो’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:25 IST2018-08-15T00:25:24+5:302018-08-15T00:25:44+5:30

विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर गीतांवर नृत्यू सादर

Independence Day: 'Bhalasagar Bharat Hovo' program, painted in patriotic song, Jalgaon | Independence Day : जळगावात देशभक्तीपर गीत, नृत्यातून रंगला ‘बलसागर भारत होवो’ कार्यक्रम

Independence Day : जळगावात देशभक्तीपर गीत, नृत्यातून रंगला ‘बलसागर भारत होवो’ कार्यक्रम

जळगाव- ए वतन आबाद रहे तू, माँ तुझे सलाम, सुनो गौर से दुनियावालो यासह विविध देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून १५ आॅगस्टच्या पुर्वसंध्येला मंगळवारी कांताई सभागृहात आयोजित ‘बलसागर भारत होवो’ हा कार्यक्रम चांगलाच रंगला़ हा कार्यक्रम भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता़
कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रिगेडियर विजय नातू, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ज्योती जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दिपीका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या-जयोस्तुते हे गीत सादर झाले़ तोच अमेय कुळकर्णी यांनी ह्यमा तुझे सलामह्ण, श्रुती वैद्य ने ह्यहे राष्ट्र देवतांचेह्ण हे गीत सादर केले. मयूर पाटीलने ह्यभारत हमको जान से प्याराह्ण गीत सादर केले, मेरे देश की धरती, हे गीत आर. डी. पाटील यांनी सादर केले. सुनो गौर से दुनियावालो, देश रंगीला, कर चले हमं फिदा, तिजा तेरा रंग साथ था मैं तो, जिंदगी मौत ना बन जाये, अशी देशभक्तीपर गीते सादर झाली.
विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर
अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. नृत्याचे दिग्दर्शक ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी केले होते. गायक कलाकार स्वानंद देशमुख, सुनंदा चौधरी, सेजल वाणी, रसिका ढेपे, मयूर पाटील, राजेंद्र माने, आर. डी. पाटील हे होते. कार्यक्रमात दोन गाण्यामध्यें अयाज पाटील यांनी वाजविलेला शंख भारावलेल्या वातावरणात भर घालून गेला. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. गयास अहमद उस्मानी यांनी केले़ आभारप्रदर्शन दीपक चांदोरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Web Title: Independence Day: 'Bhalasagar Bharat Hovo' program, painted in patriotic song, Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.