शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जळगावात आवक घटल्याने बाजरी तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:31 IST

बाजारगप्पा :कमी पावसामुळे जळगावात शेतीमालाची आवक घटून त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.

- विजयकुमार सैतवाल (जळगाव)

कमी पावसामुळे जळगावात शेतीमालाची आवक घटून त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ऐन उडीद, मुगाची आवक असणाऱ्या काळातच उडीद, मूग तसेच डाळींमध्ये व ज्वारी, बाजरी, दादरच्या भावात मोठी वाढ झाली. डाळींमध्ये तर ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. 

गहू व तांदळाचे भाव स्थिर असल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा आहे. सप्टेंबरपासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. त्यानुसार यंदाही ही आवक सुरू झाली. मात्र, मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद, मुगाच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. उडीद, मुगाची आवक कमी असल्याने या डाळीत तेजी सुरू झाल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.

गेल्या आठवड्यात ६,२०० ते ६,६०० रुपये प्रति क्विंटल मुगाची डाळ या आठवड्यात ७,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल झाली. उडदाची डाळही ४,७०० ते ४,८०० रुपयांवरून ५,२०० रुपये प्रति क्विंटल झाली. हरभरा डाळ, तूर डाळदेखील स्थिर आहे. नवीन उडीद-मुगामध्ये काही माल बारीक, काही माल डागी असल्याने मुगाला ३,२०० ते ४,००० रुपये, तर उडदाला २,८०० ते ३,००० रुपये, मुगाचे भाव ५,००० रुपयांवरून ५,५०० ते ५,८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले. चांगल्या दर्जाच्या उडदाचे भाव ३,५०० ते ४,००० रुपयांवरून ४,५०० ते ४,८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले.

गव्हाचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २,४०० ते २,५०० रुपयांवरून २,४५० ते २,५५० रुपये प्रति क्विंटल, लोकवन गव्हाच भाव २३५० ते २४५० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपये आणि चंदोसीचे भाव ३,६५० ते ३,८५० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड