अवैध गौण खजिन वाहतूकदारांची वाढती मुजोरी, तहसीलदारांच्या वाहनांवर वाळूचे ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:23 AM2020-01-09T11:23:11+5:302020-01-09T11:30:35+5:30

पहाटेची घटना, आरोपी ट्रॅक्टरसह पोलिसांच्या ताब्यात

 Increased wage of unpaid treasure troopers | अवैध गौण खजिन वाहतूकदारांची वाढती मुजोरी, तहसीलदारांच्या वाहनांवर वाळूचे ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

अवैध गौण खजिन वाहतूकदारांची वाढती मुजोरी, तहसीलदारांच्या वाहनांवर वाळूचे ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

Next

अमळनेर, जि. जळगाव : चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदारांच्या वाहनात गस्तीवर असणाऱ्या पथकाला वाळूच्या ट्रॅक्टरने धडक देऊन उडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना ९ रोजी पहाटे तालुक्यातील खरदे ते वासरे रस्त्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टरसह पावणे तीन लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशानुसार मंडलाधिकारी भानुदास शिंदे हे तलाठी स्वप्नील कुलकर्णी, गौरव शिरसाठ, केशव यांच्यासह चालक बाळकृष्ण जाधव यांना घेऊन तहसीलदारांचे वाहन क्रमांक एमएच १९. सीव्ही ४१८ घेऊन अवैध गौण खनिज चोरीला आळा बसवण्यासाठी गलवाडे जैतपिर परिसरात ८ रोजी रात्रीपासून गस्त घालत असताना ९ रोजी पहाटे खरदे ते वासरे रस्त्यावर त्यांना समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसले. त्यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९, ८०७ वरील चालक भीमराव कैलास वानखेडे रा. चौबारी याने सरळ तहसीलदारांच्या वाहनांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यात तहसीलदारांच्या गाडीचे १० ते १२ हजार रुपयांचे नुकसान झाले. मंडलाधिकारी शिंदे यांनी मारवड पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून भीमराव वानखेडे विरुद्ध शासकीय कामात अडथळा, मालमतेचे नुकसान, चोरी व अपघाताचा गुन्हा दाखल केला असून आरोपी वानखेडे याला ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील २ लाख ७० हजार रुपयांचे ट्रॅक्टर, ट्राली वाळूसह जप्त करण्यात आले आहे. तपास सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला करीत आहेत.

Web Title:  Increased wage of unpaid treasure troopers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.