नगरसेवकांची वाढली भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:29 AM2020-12-03T04:29:29+5:302020-12-03T04:29:29+5:30

जळगाव : पोलीसांनी सोमवारी बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात पाहणी केली असता, त्याठिकाणी मनपाच्या दैननंदिन सफार्ईच्या ठेका असलेल्या ...

Increased fear of corporators | नगरसेवकांची वाढली भिती

नगरसेवकांची वाढली भिती

Next

जळगाव : पोलीसांनी सोमवारी बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या कार्यालयात पाहणी केली असता, त्याठिकाणी मनपाच्या दैननंदिन सफार्ईच्या ठेका असलेल्या वॉटरग्रेस कंपनीसंबधी काही कागदपत्रे आढळून आले आहेत. यामध्ये काही नगरसेवकांची नावे असल्याने चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी मध्यंतरी आरोप केल्यामुळे हा मक्ता पुन्हा चर्चेत आला होता. त्यानंतर महिनाभरातच वॉटरग्रेस संबधी सापडलेल्या कागदपत्रांमध्ये ठराविक नगरसेवकांचे नाव आल्यामुळे हा मक्ता पुन्हा चर्चेत आला आहे.

वॉटरग्रेस ला सफाईचा मक्ता दिल्यापासून हा मक्ता सफाईच्या कामांविना नाही तर इतर आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. बीएचआर प्रकरणी सुनील झंवर यांच्या

निवासस्थानी व कार्यालयात पोलीसांनी छापे मारल्यानंतर त्याठिकाणी वॉटरग्रेस कंपनीची काही कागदपत्रे देखील पोलीसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान, हा मक्ता निविदेप्रमाणे

दिला असल्याने वॉटरग्रेसला मक्ता देण्यावरून काहीही तपास सुरु नसला तरी मात्र, याठिकाणी आढळून आलेल्या एका डायरी व चिठ्ठीमुळे काही शंका उपस्थित केल्या जात आहेत.

याबाबत अजून पोलीसांनी चौकशीला सुरुवात केली नसली तरी प्राथमिक माहिती घेण्यास पोलीसांनी सुरुवात केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

१५ हजारांचे घबाड, नगरसेवकांची भिती

वॉटरग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यात काम सुरु झाल्यानंतर नगरसेवकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मनपातील ६० नगरसेवकांना दर महिन्याला १५ हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील पाटील यांनी तक्रार केली आहे. दरम्यान, अभिषेक पाटील यांच्या आरोपांना कोणत्याही नगरसेवक किंवा पक्षाकडून उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र, झंवर यांच्या कार्यालयातून मिळालेल्या चिठ्ठीत ठराविक नगरसेवकांचे नाव बाहेर आल्याचे सांगितले जात असल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामुळे अनेक नगरसेवकांना धडकी भरली असल्याची माहिती भाजपच्या एका नगरसेवकाने ‘लोकमत’ ला दिली.

शॉर्ट नावांमुळे चर्चा

पोलीसांना मिळालेल्या डायरीमध्ये ४५ ते ५५ जणांचे शॉर्ट मध्ये नावे टाकण्यात आले आहेत. त्या नावांसमोर आकडे लिहण्यात आले आहेत. काही नगरसेवकांनी दिलेल्या माहितीनुसार आकड्याची रक्कम ही पैशांची असून, शॉर्टमधील नावे नगरसेवकांचीच आहेत की सफाई कर्मचाऱ्यांची किंवा इतर काही याबाबत केवळ पोलीसांकडेच माहिती आहे. बुधवारी या विषयावर मनपात चांगलीच चर्चा सुरु होती.

Web Title: Increased fear of corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.