शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

जळगावात कैरीची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:29 PM

गेल्या आठवड्याच्या तुलनेत कैरीचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांनी कमी

जळगाव : वाढत्या उन्हासोबतच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबूसह भाजीपाल्याची आवक घटत असताना कैरीची आवक वाढली आहे. एकीकडे भाजीपाल्याचे भाव वाढत असताना कैरीचे भाव कमी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कैरीचे दर प्रतिक्विंटल १७०० रुपयांनी कमी झाले आहेत.गेल्या आठवड्यात ८ क्विंटल आवक असलेल्या कैरीची आवक वाढून ती या आठवड्यात २५ क्विंटलवर पोहचली आहे. आवक वाढल्याने कैरीचे भाव ३००० रुपये प्रती क्विंटलवरून या आठवड्यात १३०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.लिंबूच्या भावातही वाढ सुरूच असून गेल्या आठवड्यात ४९०० रुपये प्रती क्विंटल असलेल लिंबूचे दर ५००० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. लिंबूसह अद्रक व भाज्यांचे दरही वाढतच आहे. अद्रकचे दर हे २५०० ते ६५०० इतके झाले आहे. कांद्याच्या दरात फारसा फरक पडला नसून ३०० ते ६५० असा दर कांद्याला मिळत आहे.पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाजी वर्गातील गिलके हे सर्वाधिका महाग अर्थात ६५०० रुपये क्विंटल दरावर पोहचले आहे, त्या खालोखाल कारले ५००० रुपये या दराने बाजार समितीत खरेदी झाले, अशी माहिती बाजार समितीचे भाजीपाला विभाग प्रमुख वासुदेव पाटील यांनी दिली.सध्या इतर भाज्यांचे दरहे पुढील प्रमाणे आहे. बीट १७००, शेवगा २०००, बटाटे ५०० ते ११००, भेंडी १००० ते २५००, गंगाफळ ८०० ते १४००, गाजर ६०० ते ११००, खिरा ६०० ते १५००, पानकोबी ७०० ते १२००, मेथी २००० ते ५०००, पालक १३००, टमाटा ५०० ते १०००, वांगे ८०० ते २२००, हिरवी मिरची २००० ते ५०००.

टॅग्स :Jalgaonजळगाव