तांब्याच्या पट्ट्या चोरी प्रकरणात दोघाच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:33+5:302021-07-02T04:12:33+5:30
स्पेक्ट्रम कंपनीतून अडीच लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरी झाल्याचा प्रकार २० जून रोजी उघड झाला होता. या गुन्ह्यातील ...

तांब्याच्या पट्ट्या चोरी प्रकरणात दोघाच्या कोठडीत वाढ
स्पेक्ट्रम कंपनीतून अडीच लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या पट्ट्या चोरी झाल्याचा प्रकार २० जून रोजी उघड झाला होता. या गुन्ह्यातील रिक्षाचालक दीपक यशवंत चौधरी (वय ३८, रा. टहाकळी, ता. धरणगाव) याला दुसऱ्याच दिवशी अटक केली होती. तर सुपरवायझर जीवन प्रदीप चौधरी व हितेश प्रभाकर कोल्हे हे दोघे जण फरार झाले होते. मंगळवारी दोघांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत त्यांच्याकडून ४७ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीचा माल विक्री करून ही रक्कम त्यांना मिळाली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, गफूर तडवी, सचिन पाटील व असीम तडवी यांनी केली. गुरुवारी दोघांना न्या.ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले.