रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे रंगमंच व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशिनचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 15:20 IST2018-12-09T15:20:13+5:302018-12-09T15:20:52+5:30

ऐनपूर, ता. रावेर , जि.जळगाव : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित सरदार वल्लभाई पटेल रंगमंच व मुलींसाठी सॅनिटरी ...

Inauguration of theater and girls for Sanitary Napkin Vending Machine at Anpur in Raver Taluk | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे रंगमंच व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशिनचे उद्घाटन

रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे रंगमंच व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशिनचे उद्घाटन

ठळक मुद्देबलवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील यांचा सन्मानमान्यवरांनी केला एन.व्ही.पाटील यांच्या कार्याचा सन्मान

ऐनपूर, ता.रावेर, जि.जळगाव : ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित सरदार वल्लभाई पटेल रंगमंच व मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडींग मशिनचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय मुंबईचे सेवानिवृत्त अव्वर सचिव बिपीन सुतार यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात संस्थेचे संचालक तथा बलवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील यांना मुख्याध्यापक महामंडळाचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दलही सत्कार करण्यात आला.
आजपर्यंत मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील यांचे गुण सुप्त अवस्थेत होते, पण आज त्यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी ठेवल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली. आज समाजाला व ऐनपूरवासीयांना त्यांच्यासारखे आदर्श लाभले. प्रत्येक शिक्षकांमध्ये ज्ञान, शक्ती असते, शक्तीचे प्रकटीकरण करणे म्हणजे खरा शिक्षक, असे उद्गार बिपीन सुतार यांनी सत्कारप्रसंगी काढले.
जन्मभूमी व कर्मभूमी हा माझा इतिहास -एन.व्ही.पाटील
माझे वय ५० वर्षे आह.े त्यापेक्षाही जादा वजनाचे सत्काराचे ओझे लोकांनी माझ्या डोक्यावर ठेवले आहे. व्यक्ती एकटा यशस्वी होत नाही त्यामागे माझ्या संस्थेचे संचालक मंडळ व शाळा यांचे मार्गदर्शन व सहकार्य, आई-वडिलांचा आशीर्वाद, पत्नी व परिवार यांचा पाठिंबा यामुळेच मी या पदांवर यशस्वी काम करू शकलो. विश्वास व काम करण्याच्या क्षमतेनेच मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकतो. माझी जन्मभूमी व कर्मभूमी हा माझा इतिहास आहे, असे उद्गार संस्था, शाळा व ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
संस्थेतर्फे अध्यक्ष भागवत पाटील व त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील यांनी एन.व्ही.पाटील व वैशाली पाटील यांचा सत्कार सन्मान चिन्ह, शाल, बुके देवून केला. तसेच शाळेतर्फे प्रमुखांनी व ग्रामस्थ, शिक्षण प्रेमींनीही या वेळी सत्कार केला.
व्यासपीठावर महामंडळ उपाध्यक्ष तथा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के.पाटील, मुख्याध्यापक टी.जी.बोरोले (खिरोदा), रावेरचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार, जि.प.चे माळी, पाचोऱ्याचे गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, संदीप महाजन, धरणगावचे बाविस्कर, बलवाडीचे गोपाल पाटील, चेअरमन श्रीराम पाटील, सचिव संजय पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक पी.एम.पाटील, आभार पी.आर.चौधरी, सूत्रसंचालन जी.आर.महाजन व सन्मानचिन्ह वाचन जे.डी.महंत यांनी केले. डॉ.सतीश पाटील, विकास महाजन, रामदास पाटील यांच्यासह संचालक मंडळ व शाळेतील कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कृषीतज्ज्ञ वसंतराव महाजन, डी.के.महाजन, राजीव पाटील, प्रल्हाद बोंडे, सुधाकर पाटील, मुकेश पाटील, पी.टी.महाजन व ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Inauguration of theater and girls for Sanitary Napkin Vending Machine at Anpur in Raver Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.