दर्यापूर शिवारात श्रवणधारा बुद्धविहाराचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST2021-05-29T04:13:10+5:302021-05-29T04:13:10+5:30
याप्रसंगी उपसरपंच मधुकर प्रधान, ग्रामपंचायत सदस्य शैला पाटील, कुसुम गायकवाड, सदस्य बोधिसत्व अहिरे, दीपक चौधरी, प्रशांत गवळी, क्युएई अधिकारी ...

दर्यापूर शिवारात श्रवणधारा बुद्धविहाराचे उद्घाटन
याप्रसंगी उपसरपंच मधुकर प्रधान, ग्रामपंचायत सदस्य शैला पाटील, कुसुम गायकवाड, सदस्य बोधिसत्व अहिरे, दीपक चौधरी, प्रशांत गवळी, क्युएई अधिकारी अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, प्रकाश इंगळे, मनोहर लोणे आदी उपस्थित होते. प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रकाश इंगळे, मनोहर लोणे, बोधिसत्व अहिरे यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली. अनेक दिवसांपासून विविध कार्यक्रमांसाठी विहाराची आवश्यकता होती, ती पूर्ण झाल्याने परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.