एरंडोल येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 13:33 IST2020-12-18T13:33:06+5:302020-12-18T13:33:06+5:30
शिवसेना सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून शुभारंभ करण्यात आला.

एरंडोल येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ
ए ंडोल : येथे आमदार चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश महाजन, शालिग्राम गायकवाड, पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी, नगरसेवक कुणाल महाजन, अतुल महाजन, चिंतामण पाटील, युवासेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी कासोदा शहरप्रमुख महेश पांडे, परेश बिर्ला, शिवसेना विभागप्रमुख देशमुख राठोड,राजेंद्र राठोड, गोविंदा राठोड, रवी जोगी, राजू जोगी, युवासेना तालुका समन्वयक कमलेश पाटील, राजेंद्र ठाकुर, अमोल भावसार, कुणाल पाटील, राज पाटील, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर भातखेडे, आनंदा धनगर उत्राण, माजी सभापती किसन पाटील, मुकुंदा पाटील मालखेडे, गजानन पाटील, कल्पेश राजपूत आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.