जळगावात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:20 IST2018-05-23T13:20:29+5:302018-05-23T13:20:29+5:30

जळगावात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश राज्य) यांच्या संयुक्तविद्यमाने जळगाव येथे पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद््घाटन २३ रोजी सकाळी ११ वाजता खासदार ए.टी. पाटील यांच्याहस्ते झाले. पासपोर्ट सेवा केंद्र तहसील आॅफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टर मध्ये राहणा आहे. या वेळी आमदार सुरेश भोळे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार, मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी, डाक अधीक्षक बी.व्ही.चव्हाण आदी उपस्थित होते.