सरस्वती विद्या मंदिरात लॅबचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:04+5:302021-07-02T04:13:04+5:30
यावेळी रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाला सहा कॉम्प्युटर व एक लॅपटॉप संच भेट म्हणून देण्यात आले. ...

सरस्वती विद्या मंदिरात लॅबचे उद्घाटन
यावेळी रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाला सहा कॉम्प्युटर व एक लॅपटॉप संच भेट म्हणून देण्यात आले. या लॅबचे उद्घाटन माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वीरेंद्र छाजेड, राजेश साखला, मनोज पाटील, प्रणव मेहता, संग्राम सूर्यवंशी, कल्पना वसाने, दीपाली देवरे आदींची उपस्थिती होती.
-----------
सरस्वती स्कूल येथे वृक्षारोपण
जळगाव : सरस्वती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे गुरुवारी कृषी दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असा संदेश देत संस्थेचे चेअरमन मुकेश सोनवणे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
---------
वसंतराव नाईक जयंती साजरी
जळगाव : सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश पाटील, पूजा तवटे, मुक्ता देशमुख आदींची उपस्थिती होती.
-------
इम्पेरिअल स्कूलमध्ये योग दिन
जळगाव : इम्पेरिअल इंटरनॅशनल स्कूल येथे नुकताचा योग दिन ऑनलाइन पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक महेश कवाडे यांनी योगाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी जी. डी. पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
--------
राज विद्यालयात जयंती साजरी
जळगाव : मेहरुण परिसरातील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात व्ही. डी. नेहते. पी. डी. नेहते. एस. टी. झांबरे, व्ही. बी.चौधरी, ए. डी. महाजन, एस. एस. सुरवाडे आदींचा सहभाग होता.