मालक नातलगांकडे गेले, चोरांनी घर साफ केले; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

By विजय.सैतवाल | Updated: October 15, 2023 15:55 IST2023-10-15T15:55:01+5:302023-10-15T15:55:04+5:30

मजुरी काम करणारे एकनाथ भगवान सपकाळे (५८, रा. शिवशंकर नगर, कांचन नगर परिसर) हे शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी घर बंद करून बाहेरगावी नातेवाईकांकडे गेले होते

In Jalgaon, gold ornaments were stolen by breaking into a locked house in Shivshankar Nagar | मालक नातलगांकडे गेले, चोरांनी घर साफ केले; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मालक नातलगांकडे गेले, चोरांनी घर साफ केले; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील कांचन नगर परिसरातील शिवशंकर नगरात बंद घर फोडून ६३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजुरी काम करणारे एकनाथ भगवान सपकाळे (५८, रा. शिवशंकर नगर, कांचन नगर परिसर) हे शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी घर बंद करून बाहेरगावी नातेवाईकांकडे गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून ६३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर सपकाळे यांनी शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी करीत पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत धनके करीत आहेत.

Web Title: In Jalgaon, gold ornaments were stolen by breaking into a locked house in Shivshankar Nagar