पहूर हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:15 IST2020-04-01T16:13:54+5:302020-04-01T16:15:02+5:30
पाच गावातील हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ८० हजारांचे रसायन नष्ट केले आहे,

पहूर हद्दीतील हातभट्ट्यांवर छापे
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाच गावातील हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ८० हजारांचे रसायन नष्ट केले आहे, तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा विभागाचे डीवाय.एस.पी. ईश्वर कातकडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, अनिल देवरे, जितुसिंग परदेशी, जितेंद्र परदेशी, अनिल सुरवाडे, भरत लिंगायत यांनी परीसरात सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून ८० हजार किमतीचे तीन हजार ४०० लीटर रसायन नष्ट केले आहे. सचिन छाडेकर पाळधी, हुसेन सरदार तडवी चिलगाव, रोहिदास शांताराम मोरे वाकोद, लताबाई राजू म्हस्के तोंडापूर, विनोद हरसिंग पारधी, नवाब बोध तडवी रा.फत्तेपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.