शिक्षकांना तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:15+5:302021-06-11T04:12:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व सातव्या वेतन आयोगाने प्रस्तावित केलेली १०, २० व ३० वर्षानंतर ...

शिक्षकांना तीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे व सातव्या वेतन आयोगाने प्रस्तावित केलेली १०, २० व ३० वर्षानंतर मिळणारी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी कमी आहेत. चटोपाध्याय आयोगानुसार शिक्षकांना सध्या १२ व २४ वर्षानंतर वरिष्ठ व निवडश्रेणी दिली जाते. परंतु निवडश्रेणीतील जाचक अटीमुळे व प्रशिक्षणा अभावी अनेक जिल्ह्यातील शिक्षक या लाभापासून वंचित आहेत. तसेच सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष बक्षी समितीने १०,२० व ३० वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभाची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची शिफारस केलेली आहे व त्याप्रमाणे राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषद शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दोन वर्षापुर्वीच याचा लाभ दिलेला आहे. शिक्षकांना ही योजना देण्याविषयी अभ्यासगट स्थापन केला असून दोन वर्षापासून त्याचा अहवाल गुलदस्त्यात आहे. शिक्षकांना हा दुजाभाव का? असा प्रश्न अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने उपस्थित केला असून, शिक्षकांना तात्काळ आश्वासित प्रगती योजना लागु करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहेृ निवेदनावर अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्यउपाध्यक्ष देवीदास बस्वदे, जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती राणे, सरचिटणीस देवेंद्र पाटील, शुभांगी पाटील, कार्याध्यक्ष नवल पाटील, संगिता पाटील, कोषाध्यक्ष राजू गायकवाड, छाया पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.