फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 15:56 IST2020-08-28T15:56:34+5:302020-08-28T15:56:49+5:30

श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची स्थापना करण्यात आली होती.

Immersion of 'Shri' in Swaminarayan temple at Faizpur | फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन

फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन

फैजपूर : श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची स्थापना करण्यात आली होती. त्या गणपतीचे विसर्जन शुक्रवारी सातव्या दिवशी केले. त्या विसर्जन पुजेचा लाभ समस्त विश्वस्त मंडळ तसेच फैजपूर समस्त सत्संग समाज यांच्यावतीने कोठारी मधुकर फिरके गुरुजी यांनी घेतला.
यावेळी श्रीगणेशजी यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मोदक, गुळाचे लाडू, शिरा तसेच विसर्जनाच्या वेळी विशेष दाखवण्यात येणारा हरभरा दाळीचा प्रसाद आदिक नेवेद्य दाखवून आरती करण्यात आली.
यावेळी शास्त्री भक्तीकिशोरदास, शास्त्री सत्यप्रकाश स्वामी, मधुकर फिरके, दिलीप वारके, पुंडलिक जावळे, पंडित भंगाळे, राकेश तिवारी, वसंत चौधरी, देवीदास फिरके, दत्तू चौधरी व रोहन फिरके उपस्थित होते.

Web Title: Immersion of 'Shri' in Swaminarayan temple at Faizpur