भुसावळला ‘प्रतिमा’उतार, अमळनेरला ‘दगड’मार!

By Admin | Updated: February 5, 2017 01:08 IST2017-02-05T01:08:24+5:302017-02-05T01:08:24+5:30

सभापतींच्या दालनातील संजय सावकारेंचा फोटो हटवला, पक्ष बदलला म्हणून सुरेखा पवारांच्या घरावर गोफणीने हल्ला

'Images' to the ghosts, 'stone-stone' in Amalnera! | भुसावळला ‘प्रतिमा’उतार, अमळनेरला ‘दगड’मार!

भुसावळला ‘प्रतिमा’उतार, अमळनेरला ‘दगड’मार!



भुसावळ/ अमळनेर  :  जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वातावरण तापू लागले आहे. याची झलक शनिवारी भुसावळ व अमळनेरात पाहायला मिळाली. तिकीट कापल्याने भुसावळ पंचायत समितीचे  सभापती राजेंद्र चौधरी यांनी आपल्या दालनातील आमदार संजय सावकारे            यांची प्रतिमा हटविली.
 तर दुसरीकडे भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या सुरेखा पवार यांच्या घरावर गोफणीने दगड मारण्यात आला. यामुळे अमळनेरात गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती.
अमळनेर येथील नव्याघरात सुरेखा पवार यांनी आजच प्रवेश केला. 4 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ‘फटफट’ असा दोन वेळा आवाज आल्यानंतर त्या घाबरल्या. मात्र गोफणीने कुणीतरी लहान दगड मारल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: 'Images' to the ghosts, 'stone-stone' in Amalnera!