मी अद्याप जिवंत आहे सर, पुन्हा तुमच्याकडे येतोय - हॅकर मनीष भंगाळेचे एकनाथराव खडसेंना उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:16 IST2019-07-04T12:16:24+5:302019-07-04T12:16:55+5:30

व्टिटर, फेसबूकवरुन पुन्हा चर्चेत

I'm still alive, sir, coming back to you - Hacker Manish Bhangale's Ekanavrao Khadasena Answer | मी अद्याप जिवंत आहे सर, पुन्हा तुमच्याकडे येतोय - हॅकर मनीष भंगाळेचे एकनाथराव खडसेंना उत्तर

मी अद्याप जिवंत आहे सर, पुन्हा तुमच्याकडे येतोय - हॅकर मनीष भंगाळेचे एकनाथराव खडसेंना उत्तर

जळगाव : ‘मी अद्याप जिवंत आहे सर, आणि मी तुमच्याकडे पुन्हा येतोय’ अशा शब्दात व्टिट करत हॅकर मनीष भंगाळे याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना व्टिटरव्दारे उत्तर दिले आहे. भंगाळे याच्या व्टिटमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणादरम्यान हॅकर मनीष भंगाळे याने केवळ माझ्यावर आरोप करण्यासाठीच जन्म घेतला होता का ?, माझ्यावर आरोप केल्यानंतर भंगाळे कुठे गेला ? तो जिवंत आहे की मेला ? असे प्रश्न उपस्थित करून भंगाळे याला केवळ माझ्यावर आरोप करण्यासाठी पुढे करण्यात आले होते असाही आरोप खडसे यांनी केला होता.
खडसेंचे विधीमंडळातील हे भाषण गाजल्यानंतर याच भाषणाची लिंक जोडत मनीष भंगाळे याने व्टिटर वर व्टिट करत एकनाथराव खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. फेसबुकवर देखील भंगाळे याने पोस्ट केले असून, त्याने एकनाथराव खडसे यांच्या अधिकृत अकांउटला टॅग देखील केले आहे. एकनाथराव खडसे हे मंत्री असताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी मोबाईलवर त्यांचे संभाषण झाल्याचा आरोप करुन मनिष भंगाळे हा प्रकाशझोतात आला होता. मात्र, त्यानंतर मनीष भंगाळे हा अलीप्त झाला होता.
दरम्यान, व्टिटरवर देखील भंगाळे फार काही सक्रीय राहत नाही. बुधवारी केलेल्या व्टिटच्या आधी भंगाळे याने शेवटचे व्टिट हे मे महिन्यात केले होते.

Web Title: I'm still alive, sir, coming back to you - Hacker Manish Bhangale's Ekanavrao Khadasena Answer

टॅग्स :Jalgaonजळगाव