पशुधनाची अवैध वाहतूक,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:15+5:302021-09-16T04:23:15+5:30
एरंडोल : पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पाच बैलांची सुटका करण्यात आली आहे. यात दोन जणांना अटक ...

पशुधनाची अवैध वाहतूक,
एरंडोल : पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पाच बैलांची सुटका करण्यात आली आहे. यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
एका पिकअप वाहनातून ५ बैलांना धरणावकडून म्हसावदकडे नेले जात होते. हायवे चौफुलीवर गस्तीवर असलेले पोलिस कर्मचारी संतोष चौधरी यांनी वाहनास रंगेहाथ पकडले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामू अर्जुन शिंदे व अनिल रमेश नोजे (दोघे रा. दहीवद ता. शिरपूर, धुळे) या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पाटील, संदीप पाटील, संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.