कोंबून तीन गोऱ्ह्यांची अवैध वाहतूक, चार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:40+5:302021-07-03T04:12:40+5:30

रावेर : तीन गोऱ्ह्यांचे निर्दयतेने पाय बांधून कोंबून नेत असताना रावेर पोलिसांनी सापळा रचून चौघाही आरोपींना गजाआड केले. ...

Illegal trafficking of three bulls, four arrested | कोंबून तीन गोऱ्ह्यांची अवैध वाहतूक, चार अटकेत

कोंबून तीन गोऱ्ह्यांची अवैध वाहतूक, चार अटकेत

Next

रावेर : तीन गोऱ्ह्यांचे निर्दयतेने पाय बांधून कोंबून नेत असताना रावेर पोलिसांनी सापळा रचून चौघाही आरोपींना गजाआड केले. पाल-मोरव्हाल -रावेर रस्त्यावरील प्रमोद भंगाळे यांच्या शेताजवळ शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, रावेर न्यायालयात चौघाही आरोपींना उभे केले असता न्या. ए.एच. बाजड यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांनुसार, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील पाडल्या, ता. झिरण्या येथील दिनेश काशीराम भिलाला (वय २६) हा त्याचे साथीदार सुनील रणजित भिलाला वय २१ व राहुल प्यारसिंग भिलाला १९ यांच्या मदतीने व्हॅन (एमपी-१०-जी ३०२६) मधून दोन वर्षे वयाचे तीन गोऱ्ह्यांना अमानुषपणे पाय बांधून घेऊन जाताना रावेर पोलिसांना आढळून आले. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Illegal trafficking of three bulls, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.