अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 21:39 IST2019-12-31T21:39:17+5:302019-12-31T21:39:51+5:30
जळगाव : ममुराबाद खेडी रस्त्यावरुन वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली. ही वाहने जिल्हापेठ ...

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर पकडले
जळगाव : ममुराबाद खेडी रस्त्यावरुन वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टरवर महसूल प्रशासनाने मंगळवारी कारवाई केली. ही वाहने जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहेत. विना क्रमांकाच्या दोन वाहनात प्रत्येकी एक ब्रास वाळू तसेच एम.एच. १९ ए.पी. ७७२० या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये एक वाळू ब्रास आढळून आली. उपविभागीय अधिकारी दीपमाला चवरे व जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.