पळवून नेलेल्या डंपरमधूनच अवैध गौणखनिजाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 10:08 PM2017-08-30T22:08:25+5:302017-08-30T22:10:26+5:30

दोन डंपर,एक जेसीबी पोलीस स्टेशनला जमा, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Illegal mining transport from dump truck | पळवून नेलेल्या डंपरमधूनच अवैध गौणखनिजाची वाहतूक

पळवून नेलेल्या डंपरमधूनच अवैध गौणखनिजाची वाहतूक

Next
ठळक मुद्देगलवाडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसूलची कारवाईविकी ललवाणी याने उपविभागीय अधिकाºयाच्या परवानगिशिवाय डंपर पळवून नेले होतेपोलिसांना ते डंपर जमा करण्याचे पत्र दिले होते
नलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव, दि.३० : तहसील कार्यालयातून पळवून नेलेल्या डंपरद्वारेच पुन्हा अवैध गौणखनिज वाहतूक केल्याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला आज सायंकाळी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध गौणखनिजाची वाहतूक करणारे दोन डंपर व एक जेसीबी मारवड पोलीस स्टेशनला जमा केले आहे.तालुक्यातील गलवाडे शिवारातून अवैधरित्या गौणखनिजची चोरी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे केली होती. त्यानंतर नायब तहसीलदार प्रशांत वाघ व गलवाडे येथील तलाठी पी.एस.पाटील घटनास्थळी गेले असता, विक्की ललवाणी याच्या मालकीचे विना क्रमांकाचे जेसीबी व डंपर (क्र.एमएच १८-एम.४६८५) तसेच बाळू नथ्थु कंजर (रा.ताडेपुरा) याच्या मालकीचे डंपर (क्र.एमएच १२-ईक्यू ८५०७) मधून अवैध गौणखजिन उत्खनन होत असल्याचे आढळून येताच, पथकाने तीनही वाहने जप्त केली. दरम्यान विक्की ललवाणीवर यापूर्वी दंडात्मक कारवाई झालेली असून, त्याने उपविभगाीय अधिकाºयांच्या परवानगीशिवाय तहसील आवारातून डंपर (एमएच१८-४६८५) पळवून नेले होते. पोलिसांना ते जमा करण्याचे पत्र देण्यात आले होते. तसेच त्याच्याविरूद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत. तर बाळू कंजर याचेही डंपर (एमएच १२-एस क्यू ८५०७) अवैध गौणखनिज प्रकरणी अमळनेर पोलिसात जमा करण्यात आले होते.मात्र त्याच डंपरमधून दोघेही पुन्हा अवैध गौणखनिज वाहतूक करतांना आढळून आले. याप्रकरणी तलाठी पी.एस.पाटील यांच्या फिर्यादीवरून डंपर मालक विकी सतीश ललवाणी (रा.समर्थनगर), बाळू कंजर, याच्यासह वाहनांचे चालक व सहकारी राजेंद्र भिकनराव वेळूसकर (नांद्री), दीपक निंबा शिरसाठ (पातोंडा), कैलास युवराज नेरकर (पैलाड), अशोक गुलाब धनगर (नंदुरबार) यांच्याविरूद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Illegal mining transport from dump truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.