भुसावळ येथे अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:47 IST2018-09-22T19:45:29+5:302018-09-22T19:47:09+5:30

नाहाटा कॉलेजजवळील घटना

The illegal liquor seized at Bhusawal | भुसावळ येथे अवैध दारू जप्त

भुसावळ येथे अवैध दारू जप्त

ठळक मुद्देदेशी दारूच्या ३० बाटल्या जप्तदारू बाळगणारा पोलिसांच्या ताबयात


भुसावळ, जि.जळगाव : शहरातील नाहाटा चौफुलीजवळ अवैध दारू बाळगणारा नीलेश मधुकर गावंडे (वय ३३) रा.खडका, ता.भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी एकला पकडले.
सूत्रांनुसार, विनापरवाना, विना परमीट देशी दारू बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकली. नीलेशची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी दारूच्या एक हजार ५६० रुपये किमतीच्या ३० बाटल्या मिळाल्या.
डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलीस नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, योगेश माळी, विनोद वितकर यांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध े गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो.ना.दीपक जाधव करीत आहे.



 

 

Web Title: The illegal liquor seized at Bhusawal