शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

जळगावातील जिल्हा सामान्य रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:54 PM

निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी  शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर जळगावला हा दुसरा प्रकार त्यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे निलंबित महिला डॉक्टरचा प्रताप नाशिक येथे याच प्रकरणात दाखल आहे गुन्हाकागदपत्रांवर केली खाडाखोड

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१७  :  निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी  शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर जळगावला हा दुसरा प्रकार त्यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्हा रुग्णालयात २७ फेब्रुवारी रोजी शहरातील एक महिला गर्भपातासाठी दाखल झाली होती. या महिलेच्या पोटात १८ आठवड्याचा गर्भ असल्याने स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.रेणुका भंगाळे यांनी  गर्भपात करु नये किंवा करायचेच असेल तर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्याच्या सूचना कागदपत्रांवरच लिहिल्या. त्यानंतर ही महिला खासगी दवाखान्यात गेली. चार दिवसानंतर ही महिला परत जिल्हा रुग्णालयात आली. या महिलेला तीन मुली व एक दहा वर्षाचा मुलगा आहे. मोठी मुलगी अठरा वर्षाची आहे. पाचव्या वेळी गर्भ राहिल्याने गर्भपात करण्यासाठी ती जिल्हा रुग्णालयात आली होती.

कागदपत्रांवर केली खाडाखोडही महिला पहिल्यावेळी जिल्हा रुग्णालयात आली त्यानंतर  खासगी दवाखान्यात गेली होती. त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात आली असता या महिलेच्या कागदपत्रांवर खाडाखोड करुन ‘रिअ‍ॅडमिशन’ दाखविण्यात आले आहे. पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गर्भपाताच्या कागदपत्रांवर खाडाखोड करता येत नाही. दरम्यान, २७ फेब्रुवारी रोजीच डॉ.वर्षा लहाळे यांच्या रिपोर्टवरुन खासगी सेंटरमध्ये या महिलेची सोनोग्राफी करण्यात आली आहे.

याच प्रकरणात निलंबनसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.वर्षा लहाळे यांनी नाशिक येथेही बेकायदेशीरपणे गर्भपात केले होते व त्याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्या काही दिवस कोठडीतही होत्या. या प्रकरणात निलंबित झाल्यानंतर त्यांना निलंबन काळात जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नियुक्ती देण्यात आली. तत्कालिन शल्य चिकित्सक डॉ.सुनील भामरे यांच्या काळात डॉ.लहाळे रुजू झाल्या होत्या. निलंबन काळात मुळ काम न करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागुराव चव्हाण यांच्या काळात त्यांनी नियमबाह्य गर्भपाताचे काम केले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा