इकरा थीमच्या विद्यार्थिनी सुवर्णपदकाच्या मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:16 IST2021-03-19T04:16:13+5:302021-03-19T04:16:13+5:30
जळगाव : एच.जे.थीम कला, विज्ञान महाविद्यालयाच्या बी.ए. उर्दू व बी.एस्सी. माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी नुकत्याच शैक्षणिक वर्ष २०१९-२० ...

इकरा थीमच्या विद्यार्थिनी सुवर्णपदकाच्या मानकरी
जळगाव : एच.जे.थीम कला, विज्ञान महाविद्यालयाच्या बी.ए. उर्दू व बी.एस्सी. माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी नुकत्याच शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठद्वारा घोषित गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त करून सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्या आहेत.
बी.ए.अभ्यासक्रमाच्या उर्दू विषयाचे गुणवत्ता यादीत उनजेला नाज नफिस शेख हिने प्रथम स्थान प्राप्त करून सुवर्णपदक पटकाविले. नाज रईस अहमद द्वितीय तर जुवेरिया कौसर मुंजीर हसन शेख हिने तृतीय स्थान प्राप्त केले. तसेच बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या आयटी विषयाच्या गुणवत्ता यादीत शेख मुनज्जा सदफ जाकीर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यार्थ्यांना प्रा. मुजम्मिल काझी, प्रा. कहेकशा अंजुम, फरहान शेख, जुनेद बुशरा आदींचे मार्गदर्शन लाभले.