स्वत:चेच उद्योग सांभाळायचे असतील तर आमदारकी सोडा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 14:04 IST2017-04-21T14:04:58+5:302017-04-21T14:04:58+5:30
हणगदरीमुक्तीसाठी शासनाकडे निधी आहे का? माजी मंत्री खडसेंचा सवाल
स्वत:चेच उद्योग सांभाळायचे असतील तर आमदारकी सोडा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
जळगाव,दि.21- जळगाव जिल्ह्यात हगणदरीमुक्तीबाबत असमाधानकारक काम आहे. कुठल्याही आमदाराने हगणदरीमुक्तीबाबत गांभीर्याने काम केलेले नाही. स्वत:चेच उद्योग सांभाळायचे असतील तर आमदारी सोडा असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला तर माजी मंत्री शासन हगणदरीमुक्तीसाठी आग्रह धरत असताना शासनाकडे पुरेसा निधी नसल्याने नागरिकांची इच्छा असताना हगणदरी मुक्त गाव होऊ शकत नसल्याचे सांगत स्वपक्षीय आहेर दिला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक नियोजन भवनात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की, आमदार हा त्याच्या मतदारसंघातील 100 गावांचे देवदूत असला पाहिजे. ज्यांना स्वत:चेच उद्योग करायचे आहेत, आणि ज्यांना सार्वजनिक कामे करण्यासाठी वेळ नाही. त्यांनी आमदारकी सोडावी, अशा शब्दात महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाषणाचा धागा पकडत हगणदरी मुक्तीसाठी अनेक गावे पुढे येतात मात्र शासनाकडे त्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांची इच्छा असूनही अनेक गावे हगणदरीमुक्त होऊ शकत नसल्याचे सांगत माजी मंत्री खडसे यांनी घरचा आहेर दिला.
दरम्यान, केंद्र शासनाच्या निर्णयानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वाहनावरील लाल दिवा काढला.