व्हॅलेन्टाईन डे साजरा कराल तर लग्न लावून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:17 IST2021-02-13T04:17:31+5:302021-02-13T04:17:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : हिंदु राष्ट्र सेना जळगावने व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यास विरोध केला आहे. ही विदेशी विकृती ...

If you celebrate Valentine's Day, let's get married | व्हॅलेन्टाईन डे साजरा कराल तर लग्न लावून देऊ

व्हॅलेन्टाईन डे साजरा कराल तर लग्न लावून देऊ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : हिंदु राष्ट्र सेना जळगावने व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यास विरोध केला आहे. ही विदेशी विकृती सहन करणार नाही. जर कुणी व्हॅलेन्टाईन डे साजरा करीत असेल तर त्याच ठिकाणी वैदिक पद्धतीने त्यांचा विवाह करून देण्याचा इशारा हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मोहन तिवारी यांनी दिला आहे.

तिवारी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘जे युवक आणि युवती व्हॅलेन्टाईन डे साजरा करताना दिसून येतील त्यांचे त्याच जागेवर त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या समोर वैदिक पद्धतीने लग्न लावून देण्यात येईल. त्यासाठीचा खर्च ब्राम्हण, मंगळसूत्र, उपरणे, शेंदूर होम हवन, वाजंत्री हे देखील हिंदू राष्ट्र सेनेकडून उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांची कागदपत्रे जन्म दाखला तपासून हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार त्यांचे लग्न लावणार असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.

Web Title: If you celebrate Valentine's Day, let's get married