भुसावळ, जि.जळगाव : जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात महत्त्व दिले जाते. नैसर्गिक आपत्ती आल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास पारंपरिक वाफेचे इंजिन याचा आधार घेऊन तिथली यंत्रणा काम करत असते, अशी माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी जपान दौºयावरून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.भारतीय रेल्वे मध्ये जपानच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा तसेच रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी रेल्वेच्या ४० अधिकाºयांना जपान दौºयावर पाठविण्यात आले होते. यात मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे सुनील मिश्रा व वरिष्ठ डीएसटी निशांत त्रिवेदी यांचा समावेश होता.जपानमध्ये सुरक्षेला फार महत्त्व दिले जाते. गाडी चालवताना रेल्वेचालकाला आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्यास इंजिनला स्वयंचलित ब्रेक लावलेले जाते. तसेच तेथील सिग्नल यंत्रणादेखील स्वयंचलित आहे.वाफेवरच्या इंजिनलाही तितकेच महत्वरेल्वे टेक्नॉलॉजीमध्ये जपान सर्वात पुढे असला सन १८८० च्या काळातील वाफेवरच्या इंजिनलाही तितकेच महत्त्व देऊन काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. नैसर्गिकदृष्ट्या वीजपुरवठा खंडित झाला तर वाफेवरच्या इंधनाचा उपयोग करता यावा यासाठी एकेक महिन्यात त्याची चाचणी घेतली जाते. भारतात सन २०२३ मध्ये मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे, याची तांत्रिक माहिती घेण्यासाठी व रेल्वेत टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बदल करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या ४० उच्च पदस्थ अधिकाºयांनी जपानला १२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान भेट दिली.जागरूकता महत्त्वाचीतेथील रेल्वे प्रशासनाला नागरिक जागरूक असल्यामुळे फार मोठे सहकार्य लाभते. तेथे कोणत्याही ठिकाणी इंचभरही कचरा व अस्वच्छता दिसत नाही. आपल्या देशातही लोकांमध्ये हळूहळू जागरूकता येत आहे. शेवटी नागरिकांच्या सहकार्याशिवाय स्वच्छता ठेवणे शक्य नाही.
नैसर्गिक आपत्ती आल्यास अत्याधुनिक रेल्वे इंजिन एवढेच वाफेचे इंजिन ही महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:50 IST
जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात महत्त्व दिले जाते. नैसर्गिक आपत्ती आल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास पारंपरिक वाफेचे इंजिन याचा आधार घेऊन तिथली यंत्रणा काम करत असते, अशी माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी जपान दौºयावरून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.
नैसर्गिक आपत्ती आल्यास अत्याधुनिक रेल्वे इंजिन एवढेच वाफेचे इंजिन ही महत्त्वाचे
ठळक मुद्देजपानमध्ये रेल्वे प्रशिक्षणानंतर सुनील मिश्रा यांची प्रतिक्रियामध्य रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांची निवड