प्रत्येक माणूस स्वकर्तृत्त्वावर जगला म्हणजे देश महासत्ता होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST2021-08-19T04:20:45+5:302021-08-19T04:20:45+5:30

अमळनेर : देशाला महासत्ता बनवायचे असेल तर दुसऱ्यांवर बॉम्ब टाकायची आवश्यकता नाही, तर प्रत्येक माणूस स्वकर्तृत्त्वावर जगला म्हणजे देश ...

If every man lived on his own, then the country would become a superpower | प्रत्येक माणूस स्वकर्तृत्त्वावर जगला म्हणजे देश महासत्ता होईल

प्रत्येक माणूस स्वकर्तृत्त्वावर जगला म्हणजे देश महासत्ता होईल

अमळनेर : देशाला महासत्ता बनवायचे असेल तर दुसऱ्यांवर बॉम्ब टाकायची आवश्यकता नाही, तर प्रत्येक माणूस स्वकर्तृत्त्वावर जगला म्हणजे देश महासत्ता होईल, असे प्रतिपादन आदर्श गाव, पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी अमळनेर येथील रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी केले.

यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर राजेश मोरे, पाचोरा येथील एम. डब्ल्यू. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक तिलोत्तमा पाटील उपस्थित होते.

पेरे पाटील पुढे म्हणाले की, रोटरीचे दुसरे नाव वारकरी संप्रदाय आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतील एकेक शब्द रोटरी अंमलात आणत आहे. चांगल्या कार्याचे निमित्त व्हा. समाज आपोआप मदतीला धावतो.

मावळते अध्यक्ष अभिजीत भांडारकर यांच्याकडून नूतन अध्यक्ष ऋषभ पारख यांनी पदभार स्वीकारला, तर सचिव पदाचा कार्यभार प्रतीक जैन यांनी स्वीकारला. सोबतच गोपाल सोनवणे, अजय मुंदडा, आशिष वर्मा, डॉ. कौस्तुभ वानखेडे यांचाही सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष अभिजीत भांडारकर यांनी मागील वर्षातील समाजासाठी रोटरी क्लबने केलेल्या विविध कामांचा आढावा मांडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय रोडगे, डॉ. दिशा जैन, डॉ. लिशा जैन यांनी केले. कार्यक्रमाला महेश पाटील, अमेय मुंदडा, ताहा बुकवाला, नीरज अग्रवाल उपस्थित होते. वसुंधरा लांडगे यांनी पसायदान म्हटले.

180821\18jal_2_18082021_12.jpg

रोटरी पदग्रहण सोहळा

Web Title: If every man lived on his own, then the country would become a superpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.