भडगावात नऊ ठिकाणी होणार मूर्ती संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:38+5:302021-09-19T04:16:38+5:30
भडगाव : एकाच ठिकाणी श्रीं चे विसर्जन करताना गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात पाच ...

भडगावात नऊ ठिकाणी होणार मूर्ती संकलन
भडगाव : एकाच ठिकाणी श्रीं चे विसर्जन करताना गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात पाच ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात येणार आहे.
शहरात १३ सार्वजनिक गणेश मंडळे तर ग्रामीण भागात ५ गणेश मंडळे असे तालुक्यात एकूण १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी व इतर खासगी श्री. गणेश भक्तांनी गणरायाची स्थापना केली आहे. दि. १९ रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री. गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे. शासनाने मिरवणुकांवर व वाद्यांवर बंदी घातली आहे.
श्री. गणेश विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करून नगरपरिषद मार्फत मूर्ती अर्पण व पाच संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. यात भडगाव गिरणा नदी पंप हाऊस वाक रस्ता, तळणी परिसर, यशवंत नगर मारोती मंदिर, शनी मंदिर व श्री. स्वामी समर्थ केंद्र परिसर, पेठ मारोती मंदिर येथील मूर्ती संकलन केंद्रात मंडळांनी मूर्ती द्याव्यात.
प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगरपरिषद प्रशासक तथा पाचोरा उपविभागीय अधिकारी डाॅ. प्रकाश बादल यांनी केले आहे.
गणेश विसर्जनासाठी भडगाव पोलीस स्टेशन मार्फत पोलीस बंदोबस्त असा लावण्यात आला आहे. यात १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, २८ पोलीस कर्मचारी, ४४ होमगार्ड असा बंदोबस्त लावला असल्याची माहिती पोलीस काॅन्स्टेबल स्वप्नील चव्हाण यांनी दिली.