यावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:49 IST2018-10-19T19:48:43+5:302018-10-19T19:49:32+5:30
न्यू चतुशृंगी दुर्गोत्सव मंडळातर्फे शहरातील नऊ आदर्श मातांचा खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव
यावल, जि.जळगाव : येथील न्यू चतुशृंगी दुर्गोत्सव मंडळातर्फे शहरातील नऊ आदर्श मातांचा खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, आदिवासी विकास प्रकल्पच्या अध्यक्ष मीना तडवी, पालिकेतील गटनेते राकेश कोलते, अन्नपूर्णा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, मनीष चौधरी, नगरसेवक पौर्मिामा फालक, देवयानी महाजन, रुखमाबाई भालेराव, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, माजी जि.प.सदस्य भरत महाजन, बाळू फेगडे, भरत चौधरी आदी उपस्थित होते.
या आदर्श मातांचा झाला गौरव
सुशीला राजेंद्रसिंग राजपूत, सुरेखा सुरेश सराफ, माया सुरेश गजरे, सुनीता पांडुरंग नेरकर, सरला अनिल चौधरी, मंगला वासुदेव चौधरी, रमाबाई रघुनाथ कवडीवाले, शांताबाई बाबुराव बारी, वत्सलाबाई मधुकर बारी.
अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक जोशी व मनोज बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर दांडिया स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर यशस्वी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशांत पाटील, बबलू येवले, संजय पाटील, नकूल माळी, गोलू जाधव, गोलू सावखेडकर, गिरीश पवार, गणेश मंदवाडे आदींनी सहकार्य केले.