मुक्ताईनगर येथील युवकाचा आदर्श उपक्रम : वाढदिवसानिमित्त केली मनोरुग्णांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:50 IST2019-06-12T17:48:33+5:302019-06-12T17:50:01+5:30
वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

मुक्ताईनगर येथील युवकाचा आदर्श उपक्रम : वाढदिवसानिमित्त केली मनोरुग्णांची सेवा
मुक्ताईनगर, जि.जळगाव : वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
मुक्ताईनगर शहरात जवळपास नऊ मनोरुग्ण आहेत. या मनोरुग्णांकडे स्वत: जाऊन त्यांची दाढी व कटिंग किंवा टक्कल करत त्यांची साफसफाई करून दिली. एवढेच नव्हे तर स्वत:च्या हाताने स्नान घालून एक आगळी मनोरुग्ण सेवा त्यांनी दिली आहे. आंघोळ केल्यानंतर ह्या रुग्णांना ड्रेस, चप्पल व जेवणदेखील सापधरे यांच्यामार्फत देण्यात आले.
याप्रसंगी विशाल झनके यांचा वाढदिवसदेखील मनोरुग्णांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी न्हावी म्हणून सुभाष सनानसे, पवन सनानसे, विजय टोंगे, चेतन चव्हाण यांनी विशेष मदत केली.
दरम्यान, कोथळी येथील स्मशानभूमीत सकाळीच जाऊन शिसम, लिंब यासारखी विविध वृक्ष लागवडदेखील सापधरे यांनी केली. यासाठी कोठडीचे पोलीस पाटील संजय चौधरी यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली होती. यावेळी विशाल भोजने, राहुल काळे, अॅड.राहुल पाटील, गणेश तायडे, युवराज चौधरी, राजेंद्र वंजारी, जयंत बोदडे, विशाल झनके, योगेश राणे, संजय चौधरी, शुभम तळेले, हरिहर पाटील, शुभम काठोके, चव्हाण, कल्याण पाटील, नीलेश पाटील आदी मित्र परिवार उपस्थित होता.