मृत्यु कसा होतो हे मोबाईलवर पाहिले अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 23:43 IST2021-01-26T23:42:46+5:302021-01-26T23:43:08+5:30
जळगावातील घटना : मामाकडे आला होता मुलगा जळगाव : मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि नंतर त्या ...

मृत्यु कसा होतो हे मोबाईलवर पाहिले अन् काही क्षणात मुलाने घेतला गळफास
जळगावातील घटना : मामाकडे आला होता मुलगा
जळगाव : मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि नंतर त्या वेबसाइटवर जन्म तारीख टाकली, मृत्यू कधी व कसा होतो हे पाहिले आणि काही क्षणातच मोबाईलमध्ये पाहिल्याप्रमाणेच हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय १३, रा. शिंदखेडा जि.धुळे) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता तुकारामवाडीत घडली. हर्षल हा मामाकडे आला होता.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल ऊर्फ सोन्या हा तुकारामवाडीतील मामा दिपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे. चौकशीत त्यांनी मुलाकडील मोबाइल जप्त केला आहे.