शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघा, कंबरदुखी जडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST

डमी १२१६ डॉक्टर देताहेत पायी चालण्याचा सल्ला, इतर व्यायामही करा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये पायी ...

डमी १२१६

डॉक्टर देताहेत पायी चालण्याचा सल्ला, इतर व्यायामही करा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये पायी चालण्याची सवय मोडली आहे. त्यामुळे कमी वयातच गुडघे आणि कंबरदुखी असे आजार जडले आहेत. कोरोनाच्या काळात तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरात अडकले. अनेकांना विविध व्याधी जडल्या. आता मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यायाम म्हणून का होईना, चालण्याचा सल्ला देत आहेत.

अनेकजण घराच्या जवळच जायचे असेल तरीदेखील गाडीचा वापर करतात. त्यामुळे अनेकांची पायी चालण्याची सवय मोडली आहे. अनेकांना पाचशे मीटरचे अंतर चालणेदेखील कठीण जाते. पायांच्या हालचाली न केल्याने अनेकांना गुडघेदुखी आणि कंबरदुखीचे आजार जडले आहेत. त्यामुळे सर्वच वयोगटांतील स्त्री आणि पुुरुषांनी पायी चालले पाहिजे.

म्हणून वाढले हाडांचे आजार

पायी न चालल्याने गुडघेदुखी तसेच इतर आजार जडतात. पायी चालल्याने पायांचे स्नायू बळकट होतात आणि त्यामुळे गुडघे आणि पाठीचे स्नायू बळकट होतात. याबाबत बोलताना अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले की, ज्यांना गुडघेदुखीचे आजार आहेत, त्यांनी कडक पृष्ठभागावर चालू नये, डांबरी रस्ते हे चालण्यासाठी टाळावे, त्यांनी लॉन किंवा माती यावर जास्त चालावे. त्यासोबतच ज्यांना कॅलरी जास्त घालवायच्या असतील तर त्यांनी इतर व्यायाम प्रकार केले पाहिजेत. पायी चालण्यासोबतच सायकलिंग, धावणे यासारखे व्यायाम प्रकार करावेत. ज्या व्यायामाने घाम येतो, असे व्यायाम करण्याचा सल्लाही डॉ. चौधरी यांनी दिला.

ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी...

ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांनी एकाच जागेवर पायांच्या हालचाली कराव्यात, सायकल चालवत असल्याची कृती करावी, प्राणायाम करावा, असेही डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले.