हिवरा प्रकल्पातील अवैध पाणी उपसा मोटारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:33 IST2019-06-20T00:32:11+5:302019-06-20T00:33:39+5:30
हिवरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाण्याची चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेत अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी ही कारवाई केली.

हिवरा प्रकल्पातील अवैध पाणी उपसा मोटारी जप्त
पाचोरा, जि.जळगाव : हिवरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाण्याची चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेत अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी ही कारवाई केली.
तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भेडसावत असताना हिवरा मध्यम प्रकल्प खडकदेवळा येथेच जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र ह्या प्रकल्पात शेतकऱ्यांनी अवैधरित्या शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोटारी टाकल्या असून, पिण्याचे पाणी शेतीला चोरून नेत असल्याने केवळ आठ ते दहा दिवसच पाणी पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. ह्या गंभीर परिस्थितीचे वृत्त १८ जूनच्या अंकात ‘हिवरा प्रकल्प मोजतोय अखेरची घटिका’ ह्या मथळ्याखाली प्रकाशित होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. तत्काळ पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाटबंधारे विभाग, महसूल विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी हिवरा प्रकल्पात अचानक धाड टाकली.
या धडक मोहिमेत प्रकल्पातील मृत साठ्यात जलपरी मोटारी टाकून शेतकºयांनी पाणीउपसा सुरू केला होता. मेहनतीने प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी पाईपलाईन व मोटारी काढून जप्त करीत कारवाई केली. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत असून आहे.