भडगाव तालुक्यातील वडजी येथे झोपडीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:03 IST2019-01-06T21:02:16+5:302019-01-06T21:03:20+5:30

वडजी येथील कौतिक शंकर थोरात यांच्या राहत्या झोपडीला आग लागून संसारोपयोगी वस्तूंची राख झाली आहे. ६ रोजी दुपारी बाराला ही घटना घडली.

Hut fire in Vadjee, in Bhadgaon taluka | भडगाव तालुक्यातील वडजी येथे झोपडीला आग

भडगाव तालुक्यातील वडजी येथे झोपडीला आग

ठळक मुद्देआगीत संसारोपयोगी वस्तू खाकनागरिकांनी आग विझवली, मात्र त्याआधीच संसार उघड्यावर

वडजी, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील कौतिक शंकर थोरात यांच्या राहत्या झोपडीला आग लागून संसारोपयोगी वस्तूंची राख झाली आहे. ६ रोजी दुपारी बाराला ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडजी येथील स्मशानभूमीजवळ राहणारे कौतिक शंकर थोरात हे पत्नी, मुले, सुना, यांच्यासह शेतात कामाला गेलेले होते. तेव्हा रविवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या राहत्या झोपडीला अचानक आग लागली.
ही माहिती परिसरातच पोहोचताच गावातील तरुणांनी आग विझविली. तत्पूर्वी झोपडीतील सर्वच संसारापयोगी वस्तूंची आगीत राखरांगोळी झाली होती. आगीचे कारण मात्र समजू शकते नाही.

Web Title: Hut fire in Vadjee, in Bhadgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.