दारुसाठी पतीने पत्नीस भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:27 PM2019-04-12T16:27:26+5:302019-04-12T16:28:25+5:30
उपचारादरम्यान मृत्यू : लासूर येथील घटनेत पतीस अटक
![Husband wife for Bhojkale for alcohol | दारुसाठी पतीने पत्नीस भोसकले Husband wife for Bhojkale for alcohol | दारुसाठी पतीने पत्नीस भोसकले](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/khuni-halla_20180474445.jpg)
दारुसाठी पतीने पत्नीस भोसकले
चोपडा : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही म्हणून राग आल्याने पतीनेच पत्नी सुनंदा अनिल भिल (वय २५) हिस चाकूने भोसकल्याची घटना लासूर येथे घडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याने पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत प्राप्त वृत्त असे की, सुनंदा अनिल भिल हिचा विवाह अनिल आधार भिल याचेशी सात वर्षांपूर्वी झाला होता मात्र तो नेहमी दारू पिऊन त्रास देत असल्याने गेल्या वर्षभरापासून सुनंदा माहेरी वराड ता. चोपडा येथे राहत होती. ७ रोजी तिचा नंदोई मुलाचे लग्नासाठी तिला लासुर येथे घेऊन आले. तेथे ९ रोजी संध्याकाळी ७ वाजता पती अनिल भिल याने सुनंदाकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तिने दिले नाही याचा राग आल्याने त्याने सुनंदास चाकूने भोसकले.
यामुळे तिला गंभीर दुखापत झाल्याने जखमी सुनंदास गावातील खाजगी डॉक्टरकडे उपचार करून वराड येथे नंदोई घेऊन आला. त्यानंतर माहेरच्या लोकांनी जखमी सुनंदास उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान ११ रोजी १० वाजता तिचा मृत्यू झाला.
या प्रकाणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुनंदाची बहीण रेखाबाई नंदू भिल (२०) रा भोईटी ता.शिरपूर ह.मु. वराड हिच्या फियार्दीवरून आरोपी अनिल आधार भिल (३०) रा. लासुर याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अनिल आधार भिल यास काही वेळातच अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर व हवालदार काशिनाथ पाटील हे करीत आहेत. आरोपीवर कडक कारवाईची मागणी सुनंदाच्या माहेरच्यांनी केली आहे.