शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पतीने पाण्यात बुडवून पत्नीची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:28 IST

सोनद नदीवरील घटना

शेंदुर्णी, ता. जामनेर : येथील फुकटपुरा वस्तीत वास्तव्यास असलेल्या भील समाजातील एक जोडपे हे १ रोजी मासे पकडण्यासाठी येथून जवळच असलेल्या जंगीपुरा येथे सोनद नदीवरील पाणी साठवण तलावात गेले असता नवरा-बायकोमध्ये वाद वाढून पतीने पत्नीची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. यानंतर पती हा स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.याबाबत वृत्त असे की, प्रकाश मोरे रा. वावडदा, ता. जळगाव व त्याची पत्नी मंगलाबाई मोरे या दोघांमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. दरम्यान ते मंगलाबाईच्या माहेरी शेंदुर्णी येथे फुकट पुरा वस्तीमध्ये वास्तव्यास होते. दिनांक १ जून रोजी येथून जवळ असलेल्या जंगिपुरा शिवारामध्ये हे पती व पत्नी साठवण तलावात मच्छी पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यात भांडण होऊन रागाच्या भरात पतीने पत्नीला पाण्यात बुडवून ठार केले. यानंतर पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत कथन केली.तर दुसरीकडे सायंकाळपर्यंत दोघेजण घरी न आल्याने महिलेचा भाऊ गजानन गायकवाड याने चौकशी केली असता त्याला त्याच्या भाचीला सांगितले की, मला वावडदा वरून फोन आला होता की, माझ्या मायला माज्या बापाने पाण्यात बुडवून मारले आहे. यावरून मयत महिलेचा भाऊ, मुलगा, मुलगी, बहिण आणि इतर सदस्य यांनी त्वरित जंगिपुरा शिवारातील सोनद नदीवरील साठवण तलाव गाठला आणि पाण्यात उतरून बघितले असता मंगलाबाई या मृत झाल्याचे समजले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत खुनाची माहिती दिली. असता पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी व शेंदुर्णी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मंगलाबाईचे शव पाण्यातून बाहेर काढले. तर पती प्रकाश मोरे यास अटक करण्यात आली असून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे हे करीत आहे.