प्रेमप्रकरणातून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 16:52 IST2019-05-04T16:52:05+5:302019-05-04T16:52:59+5:30
पाचोरा : पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा

प्रेमप्रकरणातून पतीला आत्महत्येस प्रवृत्त केले
पाचोरा : सुनेने प्रियकराशी मोबाइलवरून साईट चॅटिंग केल्याच्या कारणावरून मुलगा व सून यांच्यात भांडण झाले. यामुळे प्रियकराने मुलास धमकी दिल्याने मुलाने आत्महत्या केली, अशी फिर्याद सासऱ्याने पोलिसात दिल्यावरून पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी बाळद बु. येथील मधुकर देवराम पाटील यांचा मुलगा मयत जितेंद्र मधुकर पाटील हा पत्नीसह गावी रहात होता.पत्नीचा प्रियकर कौशल काकडे रा.कासारगल्ली भडगाव ह. मु. मुंबई पोलीस याच्याशी तिच्या मोबाइलवर वाईट चॅटिंग चालू असल्याचे मुलाने पाहिले. यावरून पती-पत्नीत भांडण झाले. यावरून प्रियकर कौशल काकडे याने जितेंद्रला फोनवरून दमदाटी केली. या विवंचनेतून जितेंद्र याने १३ एप्रिल रोजी बाळद बु. गावी पत्र्याच्या दांडीस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलाच्या मृत्यूस त्याची पत्नी व तीच प्रियकर कौशल काकडे जबाबदार असून त्याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि ३०६ नुसार मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार नलावडे करीत आहेत.