आसोदा येथे पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:31 PM2017-09-15T13:31:23+5:302017-09-15T13:32:26+5:30

सीमाचे चार वर्षापूर्वी योगेश बि:हाडेशी लग्न

The husband committed suicide by killing his wife in Asoda | आसोदा येथे पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

आसोदा येथे पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देसीमाचे चार वर्षापूर्वी योगेश बि:हाडेशी लग्नमृतदेह जिल्हा रुग्णालयात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - पती-पत्नीचा वाद होऊन पती योगेश गौतम बि:हाडे, रा. आसोदा, ता. जळगाव याने पत्नी सीमा योगेश बि:हाडे (25) हिचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील आसोदा येथे घडली. त्यानंतर पती योगेश बि:हाडे यानेदेखील रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. 
तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या सीमाचे चार वर्षापूर्वी योगेश बि:हाडेशी लग्न  झाले. दोघांना मुल-बाळ नव्हते, मात्र आता सीमाच्या पोटात दोन महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री वाद झाल्याने योगेशने सीमाचा गळा आवळून केला. याबाबत पोलीस पाटील अशोक बि:हाडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सीमाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. 
याबाबत सीमाचे वडील विजय जगन मोरे यांनी सांगितले की, लग्न झाल्यापासून योगेश सीमाचा मानसिक व शारिरीक छळ करीत होता. 
पतीने केली आत्महत्या
पत्नीचा खून केल्यानंतर योगेशने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी घटनास्थळानरून त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.  

Web Title: The husband committed suicide by killing his wife in Asoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.