जळगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:17 IST2019-12-11T13:16:14+5:302019-12-11T13:17:05+5:30
मध्यरात्रीची घटना

जळगावात पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या
जळगाव : खेडी परिसरात सोनीबाई समाधान साळवे (वय -३०) या महिलेचा पतीने कु-हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. खुनानंतर पती समाधान रमेश साळवे (वय ३५) हा फरार झाला व त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली.
धारशिरी पाळधी (ह.मु. खेडी) येथील रहिवासी असलेले साळवे दाम्पत्य हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करून दोघे जण झोपले. मध्यरात्री दोन वाजता समाधान साळवे याने घरातील लोखंडी कु-हाडीने पत्नी सोनीबाईच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर पती समाधान साळवे हा फरार झाला. त्याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बुधवारी सकाळी साळवे याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.